‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर ब्लास्ट; अक्षय वेगळ्याच अंदाजात !

0

मुंबई: कोरोनामुळे चित्रपट गृहे बंद आहेत. त्यामुळे चित्रपट पाहण्याची मजा चालली गेली आहे. कोरोनाच्या काळात अनेक चित्रपट प्रदर्शित झालेत पण ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. परंतु आता केंद्र सरकारने १५ ऑक्टोंबरपासून पुन्हा चित्रपट गृहे सुरु करण्याची परवानगी दिली आहे. आगामी चित्रपट कोणते? असा प्रश्न सगळ्यांनाच आहे. दरम्यान अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट यंदा दिवाळीनिमित्ताने रसिकांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाची जोरदार चर्चा होती. आज शुक्रवारी या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. अक्षय कुमारनेही ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ट्रेलरमधील चित्रपटाची कथेचा अंदाज येतो. चित्रपटात अक्षय एका व्यक्तीच्या भूमिकेत आहे जो भूतांना घाबरतो पण नंतर असे काही घडते की ट्रान्सजेंडरचा आत्मा त्याच्या शरीरात शिरतो. ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचा एक डायलॉग आहे, ज्या दिवशी भूत माझ्यासमोर येईल त्या दिवशी मी बांगड्या घालेन, त्यानुसार त्याचा बदलत गेलेला अंदाजात पाहायला मिळतो.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ भारतातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार नाही. मात्र, न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील सिनेमागृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ९ नोव्हेंबरला या देशांमधील सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज केला जाईल. सिने समीक्षक तरण आदर्शने सोशल मीडियावर याची माहिती दिली. तर भारतातील लोक ९ नोव्हेंबरलाच हा सिनेमा डीज्नी हॉटस्टारवर बघू शकणार आहेत.

Copy