सलग तिसर्‍या दिवशीही पेट्रोलचे दर स्थिरः जाणून घ्या आजचे दर

मुंबई : देशात पेट्रोलचे दर गगनाला भिडले असल्याने सामान्य नागरिक संतापले आहे. पेट्रोलचे दर एका लिटरसाठी शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही. सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहे. त्यामुळे थोडसा का होईना दिलासा मिळालेला आहे.

रविवारपासून इंधन दर स्थिर आहे. शनिवारी पेट्रोल 24 पैसे आणि डिझेल 17 पैशांनी वाढले होते. त्याआधी सलग तीन दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी असल्याने कंपन्यांसाठी तेलाची आयात खर्चिक बनली आहे.

 

आज मंगळवारी मुंबईत पेट्रोल 97.57 रुपयांवर कायम आहे. एक लीटर डिझेलचा भाव 88.60 रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल 91.19 रुपये आहे. डिझेलचा भाव 81.47 रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव 93.17 रुपये झाला आहे. डिझेलसाठी 86.45 रुपये भाव आहे.

कोलकात्यात आज पेट्रोल 91.35 रुपये झाले आहे. डिझेलचा भाव 84.35 रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल 94.22 रुपये असून डिझेल 86.37 रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक 89.76 रुपयांचा विक्रमी दर आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचा दर 99.21 रुपये आहे.

Copy