Private Advt

आयुक्तांनी लादलेली करवाढ ‘झिजिया करा’सारखी

जळगाव – नियमानुसार, पाच वर्षात मालमत्तांचे सर्वेक्षण करणे हे जरी सत्य असले, तरी जुन्या मिळकतधारकांना कोणतीही सुविधा न देता लादलेली कर (tax) वाढ ही मुघलकालीन झिजिया करासारखी आहे, अशी टीका मनपातील सभागृह नेते ललित कोल्हे यांनी केली आहे.

महापालिका गेल्या दोन महिन्यांपासून नवीन करवाढीच्या नोटिसा मिळकतधारकांना देत आहे मात्र, त्यात अपूर्ण माहिती आहे. मोजमाप नाही, बांधकामाचा प्रकार चुकीचा आहे. संबंधित मिळकत कोणत्या वापराखाली आहे हे स्पष्ट होत नाही, बांधकामाचे वर्ष नमूद नाही आदी त्रुटींवर ललित कोल्हे यांनी बोट ठेवले आहे. गेल्या दोन वर्षातील कोरोनाची स्थिती पाहता वाढीव कराचा बोजा टाकणे योग्य नाही. आयुक्त म्हणतात, की करवाढ केलेली नाही मात्र, आतापर्यंत ज्या नोटिसा देण्यात आल्या आहेत त्या सर्वांमध्ये किमान 40 ते 50 टक्के वाढ केलेली आहे. म्हणजेच 100 रुपयांचे 5 हजार रुपये झाले आहेत. मनपात कर्मचारी असताना मालमत्ता मोजणीचे काम इतरांकडून का करून घेतले अशी विचारणाही ललित कोल्हे यांनी केली आहे.

मागील 10 वर्षात शहराची कोणतीही वाढ झालेली नाही. उद्योग-व्यवसाय जळगाव (jalgaon) मधून इतरत्र स्थलांतरित होत आहेत. थोडक्यात शहराची अधोगती होत आहे. त्यामुळे आयुक्तांनी करवाढीचा चालवलेला प्रयोग स्थगित करावा, अशी मागणी ललित कोल्हे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.