खडसेंचे ठेवीदारांनाच बोल, तर गुलाबराव पाटील यांचे पोकळ आश्‍वासन

0

 

जळगाव – भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या (बीएचआर) निमित्ताने ठेवीदारांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. या पतसंस्थेच्या ठेवीदारांसाठी चक्क राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आवाज उठविला आहे. विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही ठेवीदारांच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. मात्र, ठेवीदारांचा प्रश्न हा काही आजचा नाही. तो जुनाच आहे. सत्ताकाळ भोगलेल्या अनेकांनी त्यांच्या काळात ठेवीदारांना न्याय का मिळवून दिला नाही? मग यांना ठेवीदारांविषयीचा पुळका आताच का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे.

‘ठेवी मला विचारून ठेवल्या होत्या का?’
बीएचआरच्या निमित्ताने एकनाथराव खडसे यांनी ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली. यासाठी त्यांनी 2018 पासून पाठपुरावा केल्याचे सांगितले आहे. पण ज्यावेळी खडसे पालकमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे ठेवीदारांनी आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्यावर खडसेंनी ‘ठेवी मला विचारून ठेवल्या होत्या का?’ असा प्रश्न करून त्यांची थट्टाच केली होती.

‘सहा महिन्यात ठेवीदारांना न्याय न मिळाल्यास फटके मारा’
खडसे यांच्याप्रमाणे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सन 2016 मध्ये सहकार राज्यमंत्री असतांना ‘सहा महिन्यात ठेवीदारांना न्याय न मिळाल्यास फटके मारा’ असे विधान केले होते. त्यांच्या काळात अ‍ॅक्शन प्लॅनही तयार करण्यावर चर्चा झाली होती. मात्र वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष उलटले तरी अ‍ॅक्शन प्लॅन काही तयार झाला नाही आणि ठेवीदारांना काही न्याय मिळाला नाही.

Copy