काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी युद्ध नव्हे चर्चेची गरज-इम्रान खान

0

इस्लामाबाद – भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन्ही देश स्वतंत्र झाल्यापासूनच काश्मीर प्रश्न हा अत्यंत कळीचा मुद्दा ठरलेला आहे. काश्मीरवरून दोन्ही देशांमध्ये युद्धेही झाली. अनेक दशके उलटल्यानंतरही काश्मीर प्रश्न सुटू शकलेला नाही. नेहमीच तणावाचे वातावरण आते. परंतू हा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर युद्ध नव्हे तर चर्चेची गरज आहे असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे.

‘काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी दोन ते तीन पर्यायांवर चर्चा झाली आहे. मात्र याविषयी एवढ्यात चर्चा करणे घाईचे ठरेल,’असे सांगितले.

यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही युद्धाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. ”अण्वस्त्रसंपन्न असलेलेल दोन देश युद्ध करू शकत नाही. कारण याचा परिणाम धोकादायक ठरू शकतो.” असे इम्रान खान म्हणाले. भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान गंभीरपणे विचार करत आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि त्यांच्या सरकारचीही हीच भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Copy