कपूर कुटुंबीय दु;खातून सावरत आहे

0

मुंबई-श्रीदेवी यांचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण कपूर परिवारावर अनपेक्षित दुःखाचा डोंगर कोसळला. श्रीदेवीचे पती बोनी कपूर हे अद्याप दुःखातून सावरलेले नाही. परंतु बोनी कपूर यांचे बंधू अनिल कपूर यांची कन्या बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर हिचे काल लग्न झाले. नुकतेच श्रीदेवीचे निधन झाले आहे. त्यामुळे ही घटना अद्याप कपूर कुटुंबीय विसरलेले नाही. परंतु लग्न समारंभ काही टाळता येणार नाही. सोनमच्या लग्नाला बोनी कपूर, अर्जुन कपूर, श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर उपस्थित झाले. लग्नाच्या निमित्ताने का होईन कपूर कुटुंब दुःखातून सावरत आहे. सोनमच्या लग्नात सर्वांनी एकत्र येत आनंद साजरा केला.

Copy