कार्यालयावर हातोडा; कंगनाची कोर्टात धाव

0

मुंबई: अभिनेत्री कंगना रानौतच्या मुंबईतील ‘मणीकर्णिका’ या चित्रपटासाठी तयार करण्यात आलेले कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याने बीएमसीने त्याच्यावर कारवाईची केली आहे. कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. नोटीस दिल्यानंतर उत्तर न घेताच मुंबई महापालिकेने ही कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाता आहे. सूडबुद्धीने ही कारवाई होत असल्याचे आरोपही होत आहे. दरम्यान या कारवाई विरोधात कंगना रानौतने मुंबई उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. कंगनाच्या वकिलाने कोर्टात याचिका दाखल केली आहे. थोड्याच वेळात १२.३० वाजता यावर सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्र सरकार आणि मुंबईवर टीका केल्याने सरकारकडून सूडबुद्धीने ही कारवाई केली जात असल्याचे आरोप भाजपने केली आहे. आजपर्यंत बीएमसीने इतकी कार्यतत्परता कधीही दाखविली नाही असा सवालही भाजपने उपस्थित केला आहे.

दरम्यान कंगनाने तोडफोडीचे फोटो ट्वीटकरत मुंबईला पुन्हा पाकिस्तानची उपमा दिली आहे. ‘पाकिस्तान, लोकशाहीची हत्या’ असे ट्वीट कंगनाने केले आहे.

कंगना रानौत आज बुधवारी ९ रोजी मुंबईत येतआहे. मुंबईला येण्यासाठी ती चंडीगडहून निघाली आहे. थोड्याच वेळात ती मुंबईला पोहोचेल. तत्पूर्वी कंगना रानौतने ट्वीट केले आहे. ‘माझे कार्यालय अयोध्या या चित्रपटासाठी तयार करण्यात आले होते. परंतु त्यावर मुंबई महानगर पालिकेने हातोडा चालविला आहे. हा हातोडा माझ्या कार्यालयावर नाही तर राम मंदिरावर आहे. इतिहासाची पुनरावृत्ती झाली असून बाबर आला आहे. बाबरकडून राम मंदिर पाडले जात आहे. मात्र आम्ही पुन्हा राम मंदिर बांधू जय श्रीराम, जय श्रीराम’ असे ट्वीट कंगना रानौतने केले आहे.