Private Advt

भगत बालाणी, कैलास सोनवणे यांच्यासह ४ नगरसेवकांचे नगरसेवकपद धोक्यात? 

जळगाव – जळगाव शहरातील चार नगरसेवकांचे नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. नगरसेवक भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, दत्तात्रेय कोळी आणि कैलास सोनवणे यांची घरकुल घोटाळ्यातील शिक्षा स्थगितीची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

घरकुल घोटाळ्यात आजी-माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसह ४८ जणांना धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यामध्ये नगरसेवक भगत बालाणी, नगरसेवक सदाशिव ढेकळे, नगरसेवक दत्तात्रय कोळी, नगरसेवक कैलास सोनवणे यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, शिक्षेला स्थगिती देण्याची या पाचही जणांची याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळून लावली आहे. घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या विद्यमान नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भात १६ मार्च २०२० रोजी न्यायालयात विशेष दावा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी दावा दाखल केला आहे. दरम्यान, आपल्या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी संबंधित नगरसेवकांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

 

न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. तायडे यांच्या खंडपीठाने ही याचिका आज फेटाळून लावली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. त्यानंतर या नगरसेवकांची याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळून लावली.