Private Advt

जयंतराव तुम्ही आमचा 25 वर्षांचा संसार मोडला – गिरीष महाजन

जळगाव – गेल्या पंचवीस वर्षापासून राज्यात शिवसेना-भाजप संसार चांगला सुरू होता मात्र जयंतराव तुम्ही आमचा पंचवीस वर्षापासून सुरू असलेला संसार मोडून टाकला असा टोला गिरीश महाजन यांनी जयंत पाटील यांना लगावला.

 

याबाबत उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की,  माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याला मी महत्त्व देत नाही .

मंत्री गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांचा विवाह सोहळ्यासाठी सोमवारी पाळधी येथील साई बाबा मंदिराच्या आवारात वधूवरांना आशीर्वाद देताना महाजन आणि पाटील यांच्यात ही जुगलबंदी  रंगली.

गिरीश महाजन व भाजपा नेते यांच्या मध्ये सत्ता गेल्याने खदखद वाढली आहे जी खदखद ते नेहमीच लोकांपुढे मांडत असतात आज त्यांनी तीच खत लग्न सोहळ्यावेळी मांडली आहे यामुळे गिरीश महाजन यांच्या या वक्तव्याला मी मुळीच महत्त्व देत नसल्याची प्रतिक्रिया जयंत पाटिल यांनी दिली.