आता थायलंडमध्येही होणार खंडोबारायांचा जयघोष

0

पुणे-छोट्या पडद्यावर जय मल्हार ही मालिका खूप गाजत आहे. मालिकेतील सर्वच पात्र रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. देवदत्त नागे, सुरभी हांडे आणि इशा केसकर या तीनही कलाकारांना या मालिकेने राज्याच्या कानाकोपऱ्यातून उदंड प्रेम मिळवून दिले. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी ‘जय मल्हार’ ही मालिका घराघरात लोकप्रिय ठरली होती. आता ही मालिका थायलंडमध्येही प्रसारित होणार त्याचा प्रोमोसुद्धा प्रदर्शित झाला आहे.

खुद्द अभिनेता देवदत्त नागेनेही ही बातमी दिली आहे. जय मल्हार मालिकेत खंडेरायची भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेवर रसिकांनी भरभरुन प्रेम केलं. त्याच्या या भूमिकेमुळे तो जणू काही खरोखरच देव आहे अशाही काही प्रतिक्रिया त्याच्या फॅन्सनी व्यक्त केल्या होत्या.आता थायलंडमध्येही ”यळकोट… यळकोट, यळकोट जयमल्हार” असा आवाज दुमदुमनार आहे. या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. ‘हे अत्यंत अभिमानाचे क्षण आहेत,’ असं देवदत्तनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.