आजाराचे कारण देत जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंचा राजीनामा

0

टोकियो: जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आज राजीनामा दिला. आजारी असल्याचे कारण देत त्यांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान पदाचे कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नसल्याबद्दल जनतेची माफी मागत जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पदाचा राजीनामा दिला. मागील काही महिन्यांपासून आजाराशी लढा देत असलेल्या पंतप्रधान आबे यांनी निश्चित केलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यापूर्वीच राजीनामा देताना प्रचंड वेदना होत आहे असे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिंजो आबे आजारी असून लवकरच ते राजीनामा देणार असल्याचे वृत्त मध्यमातून समोर येत होते. मात्र त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नव्हती. अखेर त्यांनी राजीनामा देत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

Copy