शोपियामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0

शोपिया: जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यांतील चकुरा परिसरात आज बुधवारी १४ रोजी भारतीय जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या अगोदर पाच दिवसांत जवानांनी राबवलेल्या चार मोहिमांमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली होती. तर, एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण देखील केले होते. शिवाय, दोन दिवसांपूर्वी जवानांकडून लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला याचा देखील खात्मा केला गेला आहे.

पाकिस्तानमधील असलेल्या लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्लाचा तीन दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता. ज्यामध्ये सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले होते. याशिवाय या वर्षात आतापर्यंत ७५ यशस्वी मोहिमा राबवल्या गेल्या, ज्यामध्ये १८० दहशतवाद्यांचा खात्मा झाला. स्वतंत्रपणे, १३८ दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. यावर्षी जवानांनी राबवलेल्या यशस्वी मोहिमांनी एक विक्रम प्रस्थापित केला असल्याची देखील माहिती डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली होती.

Copy