धडगाव बाजार समितीच्या सभापतीपदी जामसिंग पराडके

उपसभापतीपदी ईश्वर पावरा बिनविरोध

नंदुरबार l धडगाव येथील बाजार समितीच्या सभापतीपदी जामसिंग पारशी पराडके तर उपसभापतीपदी ईश्वर हारसिंग पावरा यांची बिनविरोध करण्यात आली. दरम्यान, धडगाव बाजार समितीही बिनविरोध झाली होती. सभापती पद शिंदे गटाकडे तर उपसभापती पद काँग्रेसकडे गेले आहे.

सभापती व उपसभापती निवड करण्यासाठी मंगळवारी, २ मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी किसन गावित, निवासी नायब तहसीलदार अक्राणी व सहाय्यक निवडणूक अधिकारी सी. के. पावरा लेखापरीक्षक, शहादा यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या कार्यालयात विशेष सभा बोलाविण्यात आली होती. सभेत जामसिंग पारशी पराडके व ईश्वर हारसिंग पावरा यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल होते. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने ही निवड जाहीर केली.