VIDEO: शिवसेनेत अंतर्गत कलह; नगरसेवक बंटी जोशींचा राजीनामा

जळगाव: महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते बंटी उर्फ अनंत जोशी यांनी आज सोमवारी  गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे महापौर भारती सोनवणे यांचा कार्यकाल संपुष्टात येत असल्याने त्यांच्या शेवटच्या महासभेत बंटी जोशी यांनी त्यांचा सत्कार केला होता. ही कृती पक्षश्रेष्ठींना आवडलेली नसल्याचे बोलले जात होते.

‘मी महापौर भारती सोनवणे यांचा सत्कार केला, या माझ्या कृतीने माझी पक्षश्रेष्ठी दुखविली गेली हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मला गटनेते या पदावर राहणे उचित नसल्याने मी गटनेते पदाचा राजीनामा देत आहे’ असे नगरसेवक बंटी जोशी यांनी सांगितले.

Copy