शरीरावर जखमा; मास्टर कॉलनीतील तरुणांचा संशयास्पद मृत्यू

जळगाव: शहरातील मास्टर कॉलनी भागातील तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तरुणांच्या शरिरावर जखमा असल्याने घातपात झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अस्लीम हनीफ पटेल (२३) हा आपल्या आई-वडीलसह राहतो. आज बुधवारी सकाळी दहाच्या जेवण करून घरातून गेला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास तो धावत धावत घरी आला. तेव्हा घरात आई-वडील नव्हते. घरात मावस बहिणी होत्या. घरी आल्यानंतर तो पलंगावर पडला. आणि काही वेळात त्याचा मृत्यू झाला. रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अस्लमला कुणी तरी मारहाण केल्याचे दिसून आले आहे. त्याचे डोके, मान आणि छातीला जखमा दिसून आल्या आहेत. मात्र ही मारहाण नक्की कुणी केली याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. त्याचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आलेले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.