भाजपा जळगाव जिल्हा ग्रामीणची जम्बो कार्यकारिणी जाहीर

0

जळगाव – भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणची प्रतीक्षित असलेली जम्बो जिल्हा कार्यकारिणी १० फेब्रुवारी २०२१ रोजी, महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे नेते आ. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष ग्रामीण आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी जाहीर केली. यामध्ये १२ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ११ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, १ कार्यालय मंत्री, ६० सदस्य, कायम निमंत्रित सदस्य आहेत.

कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी पि. सी. आबा पाटील, पद्माकार महाजन, राकेश पाटील, डी.एस.चव्हाण, अजय भोळे, के.बी.साळुंखे, कांचन फालक, महेश पाटील, नंदकिशोर महाजन, रेखा चौधरी, भरत महाजन, डॉ.विजय धांडे, सरचिटणीसपदी सचिन पानपाटील, मधुकर काटे, हर्षल पाटील, चिटणीसपदी नवलसिंग राजपूत,  कविता महाजन, सविता भालेराव, अ‍ॅड. प्रशांत पालवे, राजेंद्र चौधरी, संतोष खोरखेडे,  रंजना नेवे, रविंद्र पाटील, मेघा जोशी, सोमनाथ पाटील, शैलेजा चौधरी, कोषाध्यक्षपदी अनिल खंडेलवाल, कार्यालय मंत्रीपदी गणेश भगवान माळी, तसेच ६० कार्यकारिणी सदस्य आहेत.

Copy