न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी पुन्हा जसिंडा आर्ड्रन

0

ऑकलंड : न्यूझीलंडमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाने पुन्हा विजय मिळविला आहे. जसिंडा आर्ड्रन यांची दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाली आहे. या निवडणुकीत त्यांच्या उदारमतवादी मजूर पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. करोना संसर्ग रोखण्यात मिळवलेले यश हे आर्ड्रन यांच्या विजयाचे प्रमुख कारण मानले जाते.

निवडणुकीत पराभव झाल्यास पक्षनेतेपदाचा त्याग करण्याची घोषणा जसिंडा आर्ड्रन यांनी केली होती, पण त्यांच्या मजूर पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला. र्आड्रन यांच्या पक्षाला ४९ टक्के मते मिळाली, त्यांचा मित्रपक्ष- ग्रीन पार्टीला ७.६ टक्के, तर मुख्य प्रतिस्पर्धी पुराणमतवादी नॅशनल पार्टीला २७ टक्के मते मिळाली.

मजूर पक्षाने संसदेत बहुमत मिळवले आहे. न्यूझीलंडने प्रमाणात्मक मतदान प्रणाली स्वीकारल्यानंतर २४ वर्षांत असे स्पष्ट बहुमत कधीच एका पक्षाला मिळाले नव्हते. पूर्वी राजकीय आघाडय़ा तयार करणे भाग पडत असे, पण यावेळी आर्ड्रन यांच्या मजूर पक्षाला स्वबळावर बहुमत मिळाले आहे.

Copy