मुंबईचा कोलकातावर १०२ धावांनी मात

0

कोलकाता- मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सला घराच्या मैदानावर १०२ मात करीत सामना जिंकला. इशान किशनच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना कोलकात्यापुढे 211 धावांचे आव्हान ठेवले होते. किशनने 21 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 62 धावांची तुफानी खेळी साकारली. इशानच्या अगोदर पंड्या बंधू आणि जे पी ड्यूमिनी यांना फलंदाजीला पाठवण्यात आले. त्यामुळे इशानला संधी मिळालीच नाही. मात्र, बुधवारी इशानला चौथ्या स्थानावर पाठवण्यात आणि या संधीचा इशानने पुरेपुर फायदा घेतला. इशान मैदानात आला त्यावेळी मुंबईची स्थिती ९ षटकांमध्ये २ बाद ६२ धावा अशी होती. किशनने अवघ्या १७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. इशान किशनवर मुंबईने चक्क ६. २ कोटी रुपयांची बोली लावून त्याला संघात घेतले. एप्रिलमध्ये आयपीएल सुरु झाल्यापासून १० सामन्यांमध्ये तीन वेळा शून्यावर बाद झाल्याने त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले.

इडन्स गार्डन्स स्टेडियमवर नाणेफेक जिंकून कोलकाता कर्णधार दिनेश कार्तिक याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकात ६ बाद २१० धावांचे लक्ष्य कोलकात्यापुढे ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स 108 धावापर्यंत मजल मारू शकला. मुंबईने कोलकाताला १८.१ षटकात १०८ धावापर्यंत सर्वाबाद करून १०२ धावांनी मोठा विजय मिळवला.

धावसंख्या
मुंबई इंडियन्स : २० षटकात ६ बाद २१० धावा (इशान किशन ६२, रोहित शर्मा ३६, सूर्यकुमार यादव ३६; पियूष चावला ३/४८.) वि.वि. कोलकाता नाइट रायडर्स : १८.१ षटकात सर्वाबाद १०८ धावा (ख्रिस लिन २१, नितिश राणा २१; कृणाल पांड्या २/१२, हार्दिक पांड्या २/१६.)

Copy