नगर भूमापन मिळकतीची चौकशी

0

ठाणे :कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मौजे मांडा गावाचा विस्तारीत नगर भूमापन मिळकतीचा मालकी हक्क निश्चित करण्याकरीता १२ एप्रिलपासून चौकशी सुरु होत आहे. संबधित मिळकत धारकांनी चौकशी अधिकारी यांना आपल्या मिळकतीच्या मालकी हक्काबाबतचे कायदेशीर कागदपत्रासह माहिती पुरविण्यात यावी.

अधिक माहितीसाठी विशेष उपअधीक्षक, भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श.मा.) क्र.३, कल्याण सदनिका क्र. ४०२, के.डी.एम.सी.बिल्डींग, लोकउदयान कॉम्पलेक्स, सांगळेवाडी, कल्याण (प) येथे संपर्क साधावा असे आर.बी. फडतरे यांनी कळविले आहे.