कोरोनामुळे भारत-ब्रिटन विमानसेवा उद्यापासून स्थगित

0

नवी दिल्ली – ब्रिटनमधील (britan) कोरोनाची सद्यस्थिती पाहता या देशातून येणारी आणि जाणारी विमाने ही 22 डिसेंबरच्या रात्रीपासून स्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे 31 डिसेंबर रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. हा निर्णय 22 डिसेंबर रोजी, 11.59 वाजेपासून अंमलात येईल, असे नागरी उड्डाण मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोना व्हारयसच्या नव्या स्ट्रेनमुळे ब्रिटनमध्ये हाहाकार माजला आहे. त्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडनसहित साउथ-ईस्ट इंग्लंडच्या अनेक भागात 30 डिसेंबरपर्यंत कडक लॉकडाउनची घोषणा केली आहे. नेदरलॅण्ड, दक्षिण आफ्रिका, बेल्जिअम यांच्यासह इतर देशांनीही ब्रिटनची विमानसेवा यापूर्वीच स्थगित केली आहे. ब्रिटनमधील कोरोनाचा (kovid-19) नवा स्ट्रेन हा अधिक घातक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Copy