भारत वि.ऑस्ट्रेलिया: भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय; मालिका बरोबरीत सुटली

0

सिडनी-भारत वि.ऑस्ट्रेलियात तीन टी-२० सामने खेळले गेले. मालिकेतील शेवटचा सामना आज झाला. त्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवीत मालिका बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले. तीन २०-२० सामन्या पैकी या अगोदर ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला आहे. दुसरा सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. आजचा तिसरा सामना भारताने जिंकत मालिकेत बरोबरी साधली.

प्रथम नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १६४ धावांचे आव्हान दिले होते. भारतीय संघाची हे आव्हान पेलतांना दमछाक झाली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने विजय मिळविला. ६ गडी शिल्लक ठेवत भारताने हा विजय मिळविला.

Copy