कोरोनाचा हाहाकार सुरूच : देशात साडेआठ कोटी चाचण्या पूर्ण

0

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही तीन कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. कोरोनामुळे भारतातील परिस्थिती गंभीर झाली आहे. जगात भारताचा दुसरा क्रमांक आहे. दररोज रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. मागील गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत आणखी मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 70,496 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 964 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 69 लाख 6 हजार 152 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे देशात 1 लाख 6 हजार 490 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मागील २४ तासात म्हणजे गुरुवारी या एकाच दिवशी 11 लाख 68 हजार 705 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 70,496 पॉझिटिव्ह आले. आजपर्यंत देशात 8 कोटी 46 लाख 34 हजार 680 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

रुग्ण संख्या वाढत असली तरी दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 59 लाख 6 हजार 70 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनामुक्तांचे प्रमाण 85 टक्क्यांच्या वर गेला आहे. सध्या 8 लाख 93 हजार 592 (12.94 टक्के)रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट सातत्याने वाढत आहे. तसेच मृत्यूदरही कमी होत आहे.

Copy