२००० नोटांसंदर्भात RBI ने बँकांना जारी केल्या महत्वापूर्ण सूचना

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजाराच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. २३ मे पासून स्थानिक बँकांमध्ये दोन हजार रूपयांच्या नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत आरबीआय कडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर RBI ने देशातील बँका आणि ग्राहकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या सूचनेमध्ये नमूद केलं आहे की, नागरिकांना २३ मे पासून स्थानिक बँकेत २ हजार रूपयांच्या नोटा जमा करून त्याच्या बदल्यात रक्कम घेता येणार आहे. एकावेळी जास्तीत जास्त २० हजार रूपयांच्या नोटा जमा करून त्याच्या बदल्यात रक्कम घेता येणार आहे. एकावेळी जास्तीत जास्त २० हजार रूपयांच्या नोटा बदलून मिळतील.

नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करावी. कडक उन्हाळा लक्षात घेता ग्राहकांना सावलीमध्ये थांबण्याची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करावी. दररोज बँकेत जमा होणाऱ्या आणि बदलल्या जाणाऱ्या दोन हजार रूपयांच्या नोटांची माहिती आरबीयाकडून जारी केलेल्या आराखड्यानुसार नमूद करून घेण्यात यावी.