दिल्ली विमानतळावर आढळली आरडीएक्सने भरलेली बेवारस बॅग !

0

नवी दिल्ली: दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक संशयास्पद बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली. या बॅगेत आरडीएक्स आढळून आले आहे. टर्मिनस तीनवर ही बॅग आढळून आली. या बेवारस बॅगेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही बॅग ताब्यात घेतली.

विमानतळावरील टर्मिनस तीनच्या पिलर क्रमांक चार जवळ मध्यरात्री एकच्या सुमारास तपासणीदरम्यान सीआयएसएफचे हवालदार व्ही. के. सिंह यांना एक संशयास्पद बॅग अढळून आली. त्यानंतर या बॅगेची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पोलिसांचे एक पथक या बॅगेची तपासणी करण्यासाठी दाखल झाले. संक्षयास्पद बॅग मिळाल्याची बातमी मिळाल्यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला. बॅग ज्या ठिकाणी होती तेथील परिसरामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली. टर्मिनस तीनमधून कोणालाही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. पोलिसांनी या बॅगेची तपासणी केली असता तिच्यामध्ये आरडीएक्स असल्याचे आढळून आले. सीआयएसएफने या बॅगेमध्ये काय आहे हे फोरेन्सिक चाचणीनंतरच समजू शकेल असे सांगितले आहे.

Copy