जिल्ह्यातील 146 पैकी 78 रुग्ण जळगाव शहरात; 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

0

जळगाव – जिल्ह्यात 20 रोजी, सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोरोनाचे 146 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तसेच उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी कोरोनाबाधित 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण जळगाव शहरातील होता.

बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक 78 रुग्ण हे जळगाव शहरात आहेत. जळगाव ग्रामीण 4, भुसावळ 2, अमळनेर 18, चोपडा 20, पाचोरा 1, धरणगाव 1, एरंडोल 3, जामनेर 2, रावेर 4, चाळीसगाव 4, मुक्ताईनगर 8, इतर जिल्ह्यातील 1 असे एकूण 146 रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत बाधितांची संख्या 58 हजार 319 इतकी झाली असून, त्यापैकी 56 हजार 70 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

वाचा – कोरोना प्रतिबंधासाठी पोलिसांनाही जिल्हाधिकार्‍यांकडून कारवाईची ‘पॉवर’

 

 

Copy