पाहुणे येती घरा, तोचि दिवाळी, दसरा : महापौरांनी आनंदाने केले सर्वांचे स्वागत

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांच्या सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 रोजी गोरज मुहूर्तावर होणार्‍या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सोमवार, दि.29 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, माजी वनमंत्री संजय राठोड यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर जळगावच्या प्रथम नागरिक तथा शिवसेनेच्या पहिल्या महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

 

याप्रसंगी शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख (जळगाव शहर-ग्रामीण, अमळनेर) विष्णू भंगाळे, शहरप्रमुख शरद तायडे, सौ.सरिता माळी कोल्हे, कल्पिता पाटील, वंदना चौधरी यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.