Private Advt

गुलाब नबी आझाद यांना काश्मीरात जाण्यास सशर्त परवानगी !

0

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर राज्याला लागू असलेला कलम ३७० रद्द केल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी ३७० रद्द करण्यास विरोध दर्शविला होता. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हणत कॉंग्रेस नेत्यांनी तेथे जाण्यास परवानगी मागितली होती. मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. याबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांना काश्मीर जाण्यास सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता गुलाब नबी आझाद यांचा काश्मिरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.