Private Advt

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

0

गांधीनगर: गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचे श्वास घेतले. हृद्य विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांनी दोन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे. भाजपचे ते मोठे नेते मानले जायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना राजकीय गुरु मानायचे. मोदींच्च्या अगोदर त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे. ३० सप्टेंबर रोजी सोमनाथ मंदिर ट्रस्टचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. २००१ मध्ये त्यांच्या जागी नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. केशुभाई यांच्या जाण्याने दु:ख झाल्याचे मोदींनी सांगितले आहे.