शेतकरी आंदोलनानंतरही भाजप सुसाट; गुजरातमध्ये कॉंग्रेस फटका

0

अहमदाबाद: दिल्ली सीमेवर केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या तीन महीन्यांपासून आंदोलन सुरु आहे. आंदोलनामुळे केंद्र सरकारची आणि भाजपची प्रतिमा मलीन झाल्याचे चित्र निर्माण करण्यात येत आहे. मात्र चित्र उलटेच आहे, दिल्ली सीमेवरील आंदोलनानंतरही गुजरातमध्ये भाजपला घवघवीत यश आले आहे. गुजरातमधील सहा महानगरपालिकांच्या निवडणुकींची मतमोजणी आज मंगळवारी झाली. यात भाजपने २७० पेक्षा अधिक तर कॉंग्रेसला ५० च्या जवळपासच जागांवर विजय मिळाला आहे.

विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने अनपेक्षित यश मिळवत, गुजरातमध्ये एन्ट्री केली आहे. त्याचप्रमाणे एमआयएमनेही गुजरातमध्ये खाते उघडले आहे. सूरतमध्ये काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. सूरत महापालिकेचे जे प्राथमिक निकाल हाती आले आहेत त्यानुसार १२० जागांपैकी भाजपा आणि आपने समान म्हणजे आठ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने सहा जागांवर बाजी मारलीय. सध्या येथे भाजपा ४० जागांवर तर काँग्रेस आणि आप प्रत्येकी १० जागांवर आघाडीवर आहे.

Copy