गुजराती स्वीटस; खंडणी मागणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

भुसावळ |
शहरातील हंबर्डीकर चौकातील गुजरात स्वीटस दुकान काउंटर जवळ दोन अनोळखी इसम येऊन त्यांच्या जवळील मोबाईल दुकान मालकास देऊन राजा मोघे, सोनू मोघे यांनी दहा हजार रुपयांची खंडणीची मोबाईल मधून मागणी केली तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिल्याने पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती अशी की, (ता. १६) रोजी रवींद्र खरात उर्फे हंप्या यांच्या परिवारातील एकाच दिवशी पाच जणांचा निर्घृण हत्या करण्यात आली होता. त्या गुन्हयातील आरोपितांना भुसावळ येथील मा. न्यायालयात हजर करणार होते.याचा फायदा घेत संशयित आरोपी राजा मोघे व सोनू मोघे यांनी दोन अनोळखी २० ते २५ वयोगटातील इसमांना गुजराती स्वीटस दुकान काउंटर जवळ जाऊन त्यांच्या मोबाईल वरून फोन लावून दुकान मालका जवळ दिला “मै राजू मोघे, सोनू मोघे हंप्या ५ मर्डर वाला बोल रहा हु.मै कोर्ट मे आया हु. दोन जणांकडे देऊन टाका. नाहीतर दुकान इथे राहणार नाही. तू भी नाही रहेंगा अशी धमकी दिली म्हणून पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या आदेशावरून कपिल शशिकांत मेहता (वय ४२) राहणार तापी नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित आरोपी फरार असून पोलीस कर्मचारी शोध घेत आहे. तपास स.फौ. मोहम्मद अली सैय्यद करीत आहे.