शेतकऱ्यांना पेरणीसाठी मार्गदर्शन करा

नंदुरबार प्रतिनिधी

कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांची गुणवत्ता व पेरणीयोग्य कालाव समजावून शेतकन्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री नंदुरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत, ते जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आयोजित २०२३ च्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.

पाली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा अक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी तसेच कृषीसह विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अवकाळी पावसामुळे व नैसगिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून सुमारे ८ कोटी ५६ लाख ८७ हजार इतका निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. तो शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात तात्काळ वितरित करण्याच्या सूचनाही डॉ यांनी केल्या आहेत.

धनपूर, ता. तळोदा (उडीद पिक) दशरथ राज्या वळवी, भादवड दिलीप भामट्या भील, बामखेडा, ता शहादा (तूर पिक), सखाराम गावित, खोकसा, ता. नवापूर (उडीद पिक) यांचा समावेश आहे.