नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यास सुवर्णपदक

भुसावळ | प्रतिनिधी

पु. ओं. नाहाटा महाविद्यालयात सदैव अभ्यासाबरोबर खेळ व इतर कलागुणांना वाव दिला जातो. महाविद्यालयातील विद्यार्थी नेहमी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन महाविद्यालयाचे नाव उंचावत असतात. कनिष्ठ महाविद्यालयाच्या या परंपरेत बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी लोकेश गणेश ठाकूर याने शिर्डी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भर टाकली आहे. या कामगिरीमुळे तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या बद्दल महाविद्यालयातर्फे त्याचे
अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या. सदर विद्यार्थ्यास कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक मनोज वारके यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, खजिनदार संजय नाहाटा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. एस. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. वाय. एम. पाटील, पर्यवेक्षक श्रीमती शोभा तळेले, तसेच सर्व शिक्षक वृंदांनी त्याचे कौतुक केले. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.