पेट्रोल दरवाढीवर तोडगा निघण्याची शक्यता: मोदींची अर्थमंत्री, पेट्रोलियम मंत्र्यांसोबत बैठक

0

नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत केंद्र सरकारने 2.50 रुपये प्रति लिटरचा कपात केल्याच्या एक आठवड्यानंतर आणखी पेट्रोलचे दर कमी करण्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची बैठक होणार आहे. या बैठकीत पेट्रोलच्या वाढत्या किंमतीबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

4 ऑक्टोबर रोजी केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींसाठी प्रति लिटर 2.50 रु. ची कपात जाहीर केली होती. एक्साइज ड्युटीमध्ये 1.50 रुपये प्रति लिटरचा केंद्र सरकार तर उर्वरित एक रुपया ऑइल मार्केटिंग कंपन्या शोषणार होत्या.

Copy