माजी मंत्री दिग्विजय सिंह यांची कन्या श्रेयशी सिंह भाजपात

0

नवी दिल्ली: बिहारचे माजी मंत्री स्व: दिग्विजय सिंह यांची कन्या नेमबाज खेळाडू श्रेयशी सिंह भाजपात प्रवेश करणार आहे. दिग्विजय सिंह चंद्रशेखर राव तसेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. २०१० मध्ये त्यांचे निधन झाले. जनता दल, समता दलाचे ते नेते होते. बांका लोकसभेचे त्यांनी प्रतिनिधित्त्व केले आहे. राज्यसभेवर देखील ते होते. श्रेयशी सिंह या अंतराष्ट्रीय नेमबाज आहेत. त्यांनी २०१८ मध्ये कॉमनवेल्थमध्ये सुवर्ण पदक पटकविले होते. २०१४ मध्ये सिल्वर मेडल देखील मिळविले आहे. त्यांनी आता राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी आज रविवार ५ ऑक्टोबर रोजी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Copy