तेलंगणा कॉंग्रेस कार्यकारी अध्यक्षपदी माजी क्रिकेटर अजहरुद्दीन !

0

नवी दिल्ली-कॉंग्रेसने भारतीय संघाचा माजी कर्णधार तथा माजी खासदार मोहम्मद अजहरुद्दीन यांची तेलंगणा कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. कॉंग्रेसचे महासचिव अशोक गेहलोत यांनी आज ही माहिती दिली. गेहलोत यांनी पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्या सूचनेवरून अजहरुद्दीन यांची निवड केल्याचे सांगितले. सोबतच त्यांनी तेलंगणा कॉंग्रेसच्या दोन उपाध्यक्षांची निवड केली आहे.