BREAKING: देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

0

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. फडणवीस हे गेल्या काही बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचा दौरा करीत आहेत. महाराष्ट्रात देखील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.

माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी ट्विट करत करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली. ‘लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी ईश्वराची इच्छा असेल असे फडणवीस यांनी म्हटले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी,” असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे.