नगरपालिकेच्या वास्तू हडप करण्याचा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा मानस

नंदुरबारला माजी आ. शिरीष चौधरी यांचा पत्र परिषदेत आरोप

नंदुरबार प्रतिनिधी।

थील छत्रपती शिवाजी महाराज आतापर्यंत सुमारे ५० कोटींचा अपहार झाला आहे. नगरपालिकेच्या वास्तू हडप करण्याचा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा मानस असल्याचा आरोप माजी आ. शिरीष चौधरी यांनी केला आहे. ‘आपली पालिका आपला अभिमान’ असे नव्हे तर ‘आपली पालिका आपले दुकान’ असे ब्रीद वाक्य असायला हवे असा टोलाही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या बाजूला डोम तयार करण्याच्या ठराव पालिकेने केला होता. परंतु विरोधकांनी आयएएस प्रशासक अधिकाऱ्यांना हाताशी धरून नोटीसा दिल्याचा आरोप चंद्रकांत रघुवंशी यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी

घेतलेल्या पत्र परिषदेत माजी आ. शिरीष चौधरी बोलत होते. पत्र परिषदेला माजी नगरसेवक चारुदत्त कळवणकर, माळी आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, नंदुरबार पालिकेअंतर्गत २००७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर उभारण्यात आले आहे. शहरातील पालिकेच्या मालकीच्या नाट्य मंदिरासह सी. बी. गार्डन आदी मालमत्ता ऑडिट नसलेल्या अवसायानत असलेल्या स्वतःच्या संस्थांना माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी कमी भाडे तत्वावर दिल्या आहेत. याबाबत त्या मालमत्तांना भाडे वाढ करणे, दुरुस्ती करणे असे करारात असताना याबाबत आम्ही अनेक वर्षापासून याबाबत संघर्ष करीत आहोत. या संघर्षाला नगरपालिकेचे प्रशासक पुलकित सिंग यांनी न्याय दिला आहे.

नंदुरबार शहरातील घरपट्टी थकबाकी असलेल्या गोरगरीबांचे चौकात बोर्ड लावून रघुवंशी यांनी नावे घोषित केले होते. आता त्यांच्या संस्थांकडे थकबाकी

● आहे त्यांचेही नावे बोर्डवर चौकात लावावे, असे आवाहन श्री. चौधरी यांनी केले. नाट्य मंदिरात बुकिंग करताना लाईट बिल वेगळे घेतले जात होते. २००७ ते आतापर्यंत १६ वर्षात त्यावर खर्चही पालिकेने केला आहे. संस्थांशी करार असतात पालिकेने खर्च का केला. तेथील कर्मचाऱ्यांचा खर्चही पालिकेने केले आहे. यासह तेथे डोम बांधण्यासाठी २७ लाखाचा खर्चही पालिकेने केला आहे. जनतेच्या सेवेसाठी तयार केलेल्या डोमचे पैसेही नागरिकांकडून वसूल करण्यात येतात. डोम बांधण्यासाठी ठराव केल्याचे श्री. रघुवंशी यांनी सांगितले. मात्र, त्याला शासनाची मान्यता मिळालेली नाही. ठराव केल्यावर शासनाची परवानगी आवश्यक असते. त्याला परवानगी नसताना त्याचा वापर करून नागरिकांकडून पैसे वसूल करण्यात आले. ते पैसे गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित करत छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात सुमारे ५० कोटींचा अपहार झाल्याचा आरोप श्री. चौधरी यांनी केला.

»» शहरातील संजय टाऊन हॉल बांधताना शेतकऱ्यांसाठी बांधण्यात आल्याचे सांगत पालिकेच्या जागेवर व्यापाऱ्यांचे पैसे घेऊन हॉल बांधण्यात आला. मात्र, संजय टाऊन हॉल स्वता:च्या ताब्यात घेऊन एकाही शेतकऱ्याच्या मुलाचे तेथे मोफत लग्न लावले नाही. तसेच छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात अवैध त्यांचे ऑफिस चालविले जात आहे. हे ऑफिस बंद न झाल्यास नाट्य मंदिरात भाजपाचे ऑफिस उघडण्याचा • इशारा त्यांनी यावेळी दिला. याबाबत नाट्य मंदिरात झालेल्या अपहार प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराची बुकिंग यापुढे बांधकाम विभागाकडे होणार असल्याचे निर्देश नगरपालिकेचे प्रशासक पुलकित सिंग यांनी दिले आहे.