आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर व्हायला हवे-अर्थमंत्री जेटली

0

मुंबई : जगाला सीमामुक्त व्यापाराची गरज आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे तातडीने दूर झाल्यास जागतिक आर्थिक विकासाचे दरवाजे उघडतील असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याहस्ते जागतिक सीमा शुल्क संघटनेच्या वार्षिक बैठकीचे आज मुंबईत उद्घाटन झाले.

सीमा शुल्कातील चोरी रोखण्यासाठी नॅशनल ट्रेड फॅसिलिटेशन ऍक्शन प्लॅन सरकारने तयार केला आहे. त्यासंबंधी चार देशांशी भारत या बैठकीत करार करणार आहे. अॅडव्हान्स फॅसिलिटेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम अंतर्गत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचेही जेटली यांनी सांगितले.

Copy