दहशतवादविरोधी लढाईत अमेरिका भारतासोबत; अमेरिकेचे आश्वासन

0

नवी दिल्ली – मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याला काल १० वर्षे पूर्ण झाली आहेत. दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दहशतवादाविरोधातील लढाईत भारताची साथ दिली आहे. अमेरिकेने दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासोबत दृढ निश्चयाने उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ट्वीट करून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भावना व्यक्त केली.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1067142262545674240

‘मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या दशपूर्तीनिमित्त न्यायासाठी अमेरिका भारतीयांसोबत आहे. या हल्ल्यामध्ये ६ अमेरिकन नागरिकांसोबत १६६ निष्पाप लोकांचे प्राण गेले होते. आम्ही कधीही दहशतवादाला जिंकू किंवा जिंकण्याच्या जवळ जाऊ देणार नाही’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने याआधी मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला ३५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. या हल्ल्यात अमेरिकेच्या सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी सांगितले की, मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले.

२६/११ च्या सूत्रधारांना पकडण्यासाठी अमेरिकेकडून ३५ कोटींचे बक्षीस

अमेरिकेकडून २६/११ हल्ल्यातील शहीदांना काल श्रध्दांजली वाहण्यात आली. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री समुद्रामार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. दहशतवाद्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यामध्ये 34 परदेशी नागरिकांसह 166 नागरिकांना प्राण गमवावा लागला, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते.

Copy