म्हणून प्रत्येकाने प्यावा ‘हर्बल टी’

जळगाव –

वनस्पतींचा चहा अर्थात हर्बल टी हा ताजतवानं करण्याचा एक स्वादिष्ट उपाय आहे. शिवाय या हर्बल टी मधे आरोग्यास उपकारक आणि वेगवेगळ्या आजारांवर फायदेशीर असे पोषक घटक असतात. हर्बल टीमुळे पोटाला थंडावा मिळतो, पोटास हलके वाटते. पचन सुधारण्यास हे चहा मदत करतात. हर्बल टी हा अनेक प्रकारे आरोग्यास फायदेशीर ठरतो. थंडीत होणारा सर्दी खोकल्याचा त्रास, मनावरचा ताण आणि भिती घालवण्यासाठी हे हर्बल टी उपयुक्त ठरतात.

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तर हे खूपच उपयुक्त ठरतात. हर्बल टी पिण्याच्या सवयीमुळे पोटावरची चरबी, कमरेचा घेर कमी होण्यास मदत होते. कारण या हर्बल टीमधील घटक चरबी विरघळवण्यास मदत करतात, चयापचयाची क्रिया सुधारतात. त्यामुळे हर्बल टी आणि वेटलॉस अशी गट्टी जमली आहे. या हर्बल टीच्या यादीत पुदिना आणि लिंबाचा चहा हा वजन कमी करण्यासाठी प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो. पुदिना आणि लिंबाच्या चहामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि शरीर ताजंतवानं होतं