संपूर्ण ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन

0

लंडन – पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी यूकेमध्ये पुन्हा एकदा प्रदीर्घ कालावधीसाठी लॉकडाउन (uk lockdown) लागू करण्याची घोषणा केली आहे. हे लॉकडाऊन फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत राहील. याअंतर्गत बुधवारपासून सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूमुळे (covid 19) सर्वाधिक मृत्यू झाल्यामुळे 4 कोटी 40 लाख लोकांवर याआधीपासूनच निर्बंध आहेत. जॉन्सन म्हणाले की, कोरोनाबाधित 27 हजार रुग्ण सोमवारी रुग्णालयात दाखल होते. गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत ही संख्या 40 टक्के अधिक आहे. त्याच महिन्यात कोरोनाची पहिली लाट ब्रिटनमध्ये आली होती. गेल्या मंगळवारी केवळ 24 तासात 80,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. कोरोनाच्या नवीन विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत, असेही जॉन्सन यांनी स्पष्ट केले आहे. आता घोषित केलेले दीड महिन्याचे लॉकडाऊन हे मागील वर्षी मार्च ते जून अखेरपर्यंत जे निर्बंध होते त्याप्रमाणेच आहे. परंतु, यावेळी महत्त्वपूर्ण कामांसाठी जनता घराबाहेर पडू शकते. व्यायाम, वैद्यकीय मदत आणि घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी घराच्या बाहेर निघण्याची सवलत ब्रिटनच्या रहिवाशांना मिळाली आहे.

 

Copy