मांजरीमुळे विमानांची इमरजन्सी लँडींग !

सूडान : एका आक्रामक मांजरीमुळे सूडानमध्ये विमानाला इमरजन्सी लँडीग करावी लागल्याची घटना समोर आली आहे. सूडानची राजधानी खार्तूमच्या विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या फ्लाइटमधील पायलटवर मांजरीने हल्ला केल्याने पायलटने इमरजन्सी लँडींग केले.

स्थानिक मीडिया हाउस अल-सुदानीच्या रिपोर्टनुसार, खार्तूम इंटरनॅशनल एअरपोर्टहून उड्डाण घेतल्यावर साधारण दीड तासांनी अचानक विमानातील एक मांजर कॉकपिटमध्ये शिरली आणि तिने पायलटवर हल्ला केला. मांजर फारच घाबरलेली होती आणि त्यामळे ती अधिक आक्रामक झाली होती. कॅबिन क्रूच्या सदस्यांनी मांजरीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ते काही जमले नाही. अखेर विमानाचे इमरजन्सी लँडींग करावे लागले. स्थानिक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, विमान खार्तूम विमानतळावर एका हँगरमध्ये उभं करण्यात आले होते. शक्य आहे की, याच हँगरमध्ये मांजर विमानात शिरली असेल. सध्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Copy