राष्ट्रवादी प्रवेशाचे खुद्द खडसेंकडून संकेत

0

जळगाव – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचे संकेत खुद्द खडसेंनी आज सकाळी दिले. एकनाथराव खडसे यांनी जयंत पाटील यांचे ट्विट रिट्विट केले आहे. महत्त्वाचे म्हणजे या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेली आहे. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीट केले.

नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशवासियांना संबोधून भाषण केले. त्यांच्या या भाषणावर टीका करणारे ट्विट जयंत पाटील यांनी केले होते. त्यांनी म्हटले होते की, आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, करोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना दिलासा देतील असे वाटले होते. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला. खडसेंनी हे ट्विट रिट्विट केल्याने पुन्हा एकदात त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली आहे. शुक्रवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांच्या समर्थकांकडून तशी जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.

Copy