दुसऱ्या टप्प्यात आर्थिक परिस्थितीत सुधार; आरबीआयचा दावा

0

मुंबई: भारताचा जीडीपी २३.९ टक्क्यांनी घटल्याने भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला गेल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे सर्वच क्षेत्राचे आर्थिक नुकसान झाल्याने देशासमोर आर्थिक संकट उभे राहिल्याचे आरबीआयने सांगितले. जीडीपी घसरल्यानंतर सरकारवर बरीच टीका देखील झाली. मात्र दुसऱ्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये आर्थिक सुधारणा होत असल्याचा दावा आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी केले आहे. सरकारी खर्च आणि मागणी पुरवठा यांच्यात समतोल असल्याने हळूहळू आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचा दावा केला आहे. अनलॉकमुळे अनेक उद्योग-धंदे पुन्हा सुरु झाल्याने आयात-निर्यात होऊ लागली आहे. त्यामुळे देखील आर्थिक फायदा होत असल्याचे गव्हर्नर यांनी सांगितले आहे. क्वार्टर ३ आणि चारमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न असल्याचेही गव्हर्नर यांनी साग्न्तिले.

क्यू 1 (एप्रिल-जून) मधील वास्तविक जीडीपीमध्ये 23.9% वर्षा-वर्षाच्या घटानंतर क्यू 2 मध्ये आर्थिक क्रियाकलाप स्थिर आहे. सरकारी खर्च आणि ग्रामीण मागणीमुळे उशीर झाल्याने उत्पादन हळूहळू क्विं 2 मध्ये सुधारले. कृषी दृष्टीकोन मजबूत आहे. पूर्व-कोविड पातळीपर्यंत माल हळू हळू निर्यात होत आहेः आरबीआय