‘पॅडमॅन’पासून प्रेरणा घेत दुबईस्थित मुलगी महाराष्ट्रातील २५० मुलींना पुरविणार ‘सॅनिटरी पॅड’

1

ठाणे-मासिक पाळीदरम्यान स्वच्छता न राखल्याने महिलांना अनेक आजार जडतात. अभिनेते अक्षय कुमारने ‘पॅडमॅन’चित्रपटातून याबाबत जनजागृती केलेली आहे. अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’चित्रपटापासून प्रेरणा घेत दुबईस्थित एका १३ वर्षीय मुलीने २५० मुलींना दत्तक घेतले असून त्यांना ‘सॅनिटरी पॅड’ पुरविणार आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील २५० मुलींना तिने दत्तक घेतले आहे.

रीवा तुळपुले असे या मुलीचे नाव आहे. तिचे कुटुंबीय महाराष्ट्रातील आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन दावखरे यांच्या दुबई दौ-यावर प्रसंगी या मुलीने २५० मुलींना दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली.