डॉक्टर पत्नीचा अपघाती मृत्यू

0

यावल – तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबीयांच्या वाहनाला शनिवारी गुजरातमध्ये भीषण अपघात (accident) झाला. या घटनेत वाहनचालक गणेश पाटील (23) यांचा मृत्यू झाला होता, तर उपचारादरम्यान रविवारी पहाटे अपघातातील गंभीर जखमी कांचन चौधरी (44) यांचाही मृत्यू झाला. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

किनगाव येथील डॉ. (doctor) अजय चौधरी (50) हे त्यांची पत्नी (wife) कांचन चौधरी (44), मुलगा नीतीश चौधरी (8) व कारचालक गणेश गोपाळ पाटील (23) हे कारने (एम. एच. 19 सी. यू. 3062) गुजरातच्या (Gujrat) वडताल येथील स्वामी नारायण मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यांच्या वाहनाला राजकोट (Rajkot) जवळील धुंदका गावाजवळ एका टँकरने (जी. जे. 32 टी.7020) धडक दिली. या घटनेत वाहनचालक गणेश पाटील यांचा शनिवारी मृत्यू झाला तर रविवारी पहाटे कांचन चौधरी यांचा मृत्यू झाला. डॉ. अजय चौधरी व त्यांचा मुलगा नितीश हे गंभीर जखमी आहेत. अपघातामधील मृतांवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Copy