ग्राम दक्षता समिती रोखणार अवैध गौण खनिज वाहतूक

जळगाव । अवैध गौण खनिजाची वाहतूक रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आता ग्राम दक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. दर 15 दिवसांनी या समितीने बैठक घेऊन आढावा सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

Copy