धुळे पंचायत समितीत लाचखोर श्यामकांत सोनवणेस अटक

धुळे प्रतिनिधी ।

लेखापरीक्षणाच्या नावाने बक्षीस म्हणून ३५०० रुपयांची मागणी करणाऱ्या कनिष्ठ सहाय्यक शामकांत सोनवणे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे पंचायत समितीमध्ये एकच खळबळ उडाली आहे… तक्रारदार हे पंचायत समितीत शाखा अभियंता पदावर आहेत.

येथील शाखा अभियंता पदावर कार्यरत असणारे शामकांत सोनवणे रत्नपुरा बीट येथे नेमणुकीस होते. या ठिकाणी या बीटचे विभागीय लेखापरीक्षण झाले होते.. या झालेल्या लेखापरीक्षणाच्या नावाने बक्षीस म्हणून लाच मागितली जात होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे संपर्क साधला. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. कनिष्ठ सहाय्यक शामकांत सोनवणे हे तक्रारदार यांच्याकडे वेळोवेळी भेटून अथवा मोबाईलवर संभाषण करून लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार धुळेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता कनिष्ठ सहायक श्यामकांत सोनवणे यांनी तक्रारदार यांच्याकडे ३५०० रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी करून लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडुन स्विकारतांना सोमवारी रंगेहाथ पकडण्यात आले. देवपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.