Private Advt

धुळे विधानपरिषद ब्रेकिंग : अमरीश पटेल बिनविरोध

धुळे- नंदुरबार विधान परिषद मतदारसंघासाठी झालेल्‍या निवडणुकीत अमरिश पटेल पुन्हा बिनविरोध निवडून आले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.. त्‍यांच्‍या विरोधात महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे गौरव वाणी होते. मात्र आज वाणी यांनी माघारी घेतल्‍याने पटेल यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या धुळे व नंदुरबार विधान परिषद मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षातर्फे येथील आमदार अमरीशभाई पटेल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. अमरीशभाई पटेल हे २००९ पासून धुळे– नंदुरबार मतदारसंघातून विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पोटनिवडणुकीसाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्यात देखील विजय मिळविला होता. आता सलग तिसऱ्यांदा ते उमेदवारी करीत आहेत.