धुळ्यात एमआयएमचे फारुक शहा विजयी

0

धुळे : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी, 24 रोजी दुपारी पुर्णत्वास आली. अपक्ष उमेदवार अनिल गोटे आणि एमआयएमचे फारुक शहा यांच्यात चुरस झाली होती. अखेर शेवटच्या क्षणी फारुक शहा यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. यावेळी त्यांच्या हितचिंतकांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला़ याशिवाय जिल्ह्यातील उर्वरित चार मतदार संघात विजयी झालेल्यांमध्ये शिंदखेडा मतदार संघातून विद्यमान मंत्री जयकुमार रावल, धुळे ग्रामीण मतदार संघातून विद्यमान काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील, साक्री मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करणार्‍या मंजुळा गावित, शिरपूरमध्ये विद्यमान आमदार काशिराम पावरा यांना विजयी घोषीत करण्यात आले़
धुळे जिल्ह्यातील 5 मतदार संघात उमेदवारांना मिळालेली मते अशीः

शिरपूर मतदार संघः

काशिराम पावरा (भाजप) 1 लाख 20 हजार 403(विजयी)
रणजितसिंग पावरा (काँग्रेस) 7 हजार 754
डॉ.जितेंद्र ठाकूर (अपक्ष) 71 हजार 229
एकूण मतदान-2 लाख 12 हजार 92

शिंदखेडा मतदारसंघ

जयकुमार रावल (भाजप)- 1 लाख 13 हजार 42 (विजयी), संदीप बेडसे (राष्ट्रवादी काँग्रेस)- 70 हजार 512, शानाभाऊ सोनवणे (अपक्ष)-9 हजार 346

साक्री मतदारसंघ

मंजुळा गावित (अपक्ष)- 75 हजार 165 मते(विजयी), मोहन सूर्यवंशी (भाजप)-68 हजार 901, डी.एस.अहिरे (काँग्रेस)- 26 हजार 502

धुळे ग्रामीण मतदारसंघ

विजयी उमेदवार- कुणाल पाटील(काँग्रेस)-1 लाख 17 हजार 485 (विजयी), ज्ञानज्योेती भदाणे-(भाजप)-76 हजार 840

धुळे शहर मतदारसंघ

डॉ.फारुक शहा(एमआयएम)-45 हजार 277 मते(विजयी), राजवर्धन कदमबांडे (अपक्ष)-42 हजार 605, अनिल गोटे (अपक्ष)-41 हजार 848, हिलाल माळी (शिवसेना)-22 हजार 135